Home मनोरंजन बिग बॉस’ विनर MC स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार

बिग बॉस’ विनर MC स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार

420
0

‘बिग बॉस 16’चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅनला आता लग्नाचे वेध लागले आहेत. बूबा असे स्टॅनच्या गर्लफ्रेंडचे नाव असून ‘बिग बॉस’च्या घरामध्ये तो बऱ्याचदा बूबाबाबत बोलताना दिसला. आता तर त्याने त्याच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे. लवकरच बूबासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे तो अलीकडेच म्हणाला. शिवाय बिग बॉसच्या घरात जेव्हा स्टॅनची आई त्याला भेटायला आली होती, तेव्हा स्टॅन लवकरच बूबासोबत लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता बुबा कोण आहे? याविषयी जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक आहेत.नुकताच एका मुलाखतीत एमसी स्टॅन म्हणाला, ‘या एक ते दीड वर्षामध्ये मला बूबाबरोबर लग्न करायचे आहे. आम्ही गेल्या चार ते पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. ती खूप गोड मुलगी आहे. मुलगी कशी दिसते हे मी बघत नाही. फक्त ती हुशार असली पाहिजे. मी लकी आहे की, ती माझ्या आयुष्यामध्ये आहे,” असे स्टॅनने सांगितले.एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडला ‘बूबा’ या नावाने हाक मारत मारतो. पण तिचे खरे नाव अनम शेख आहे. 24 वर्षीय बूबा आणि एमसी स्टॅनची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. बिग बॉसच्या घरात स्टॅनने अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्माला त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. स्टॅन म्हणाला होता की, “माझे बुबावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे आहे. त्यामुळे मी 30 ते 40 लोकांना घेऊन बूबाच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो होतो. तिच्या घरच्यांना सांगितले, आमच्या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर तिला पळून घेऊन जाईन.”बूबा ही एमसी स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे. याआधी तो औझमा शेखसोबत रिलेशनमध्ये होता. औझमासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने स्टॅनवर अनेक आरोप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here