Home समाज बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे निधन

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे निधन

462
0

दिग्रस /मनोरा :संत सेवालाल महाराज यांचे वंशज तसेच बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबई येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. काही महिन्यांपासून त्यांना श्र्वास घ्यायला त्रास जाणवत होता ,त्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यावेळी त्यांच्या सोबत महंत शेखर महाराज होते.

सोमवारी होणार अंत्यसंस्कार
बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ११ वाजता जगाचा निरोप घेतला रामराव महाराजांविषयी बंजारा समाजात अपार श्रद्धा असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here