Home परळी वैजनाथ परळीच्या रस्त्यांवर आढळली बेवारस चिमुकली!

परळीच्या रस्त्यांवर आढळली बेवारस चिमुकली!

1303
0

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी घेतला ताबा

परळी l परळी शहरातील रस्त्यांवर एक बेवारस बालीका आढळून आली. सदरील घटनेची माहीती घेवून तात्काळ परळी शहर पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. वैद्यनाथ गॅस एजन्सीच्या समोरच्या परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहीती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी दिली. परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या बेसहारा बालिकेला ताब्यात घेतले आहे.

परळीच्या रस्त्यांवर एक ते  दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला असल्याचे आढळून आली. उस्थितांनी तात्काळ परळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी त्या बालकाला बिस्कीटे व पाणी देण्याबरोबरच स्वच्छ अंगोळ घालून कपडे बदलवले. सकाळच्या प्रहरापासून त्या बाळाची वैफल्यग्रस्त आई त्याला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती, मात्र दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-रडून थकून गेल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच वेळ त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न करूनही ती न सापडल्यामुळे परळी शहर पोलिसांना याबाबत माहीती देण्यात आली. शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी तात्काळ पोलिस वाहन व सोबत हवालदार तोटेवाड, महिला पोलिस कॉन्स्टेबला डोरले यांना पाठवून बाळाला तब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here