Home अर्थकारण Bank Holiday October 2021 :ऑक्टोबरमध्ये तब्बल 21 दिवस राहणार बँका बंद ;...

Bank Holiday October 2021 :ऑक्टोबरमध्ये तब्बल 21 दिवस राहणार बँका बंद ; बघा सुट्यांची संपूर्ण यादी

11108
0

मुंबई : येत्या ऑक्टोबर महिन्यात देशात अनेक भागात मोठे सण आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी अशा सर्वच बँका बंद राहणार आहेत. सण आणि उत्सव बघता ऑक्टोबरमध्ये जवळपास 21 दिवस बँका बंद असतील. सुट्यांमध्ये दुसरा शनिवार आणि रविवारचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे बँकांशी संबंधीत महत्वाची कामे असतील तर ती लवकर उरकून घ्या. विशेष म्हणजे या सर्व सुट्ट्या सलग किंवा कमी अंतराने नाहीत. यामुळे बँकांशी संबंधित काम करताना लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. या सुट्ट्यांमध्ये बँकेच्या शाखा बंद राहतील, परंतु एटीएम आणि रोख ठेवींसारख्या मशीन्स पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. पैसे काढण्यात किंवा जमा करण्यात ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात कारण स्थानिक सण लक्षात घेऊन सुट्ट्या निर्धारित केल्या जातात.

रिझर्व बँकेने सुट्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्या सोडून 16 दिवस सुट्टी आहे. केंद्र सरकारने सुट्यांचे तीन भाग केले आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील सुट्यांची संपूर्ण यादी
1 ऑक्टोबर 2021- हाफ ईयरली क्लोजिंग आणि बँक अकाउंट
2 ऑक्टोबर 2021- गांधी जयंती
3 ऑक्टोबर 2021- रविवार
9 ऑक्टोबर 2021- दुसरा शनिवार
10 ऑक्टोबर 2021- रविवार
17 ऑक्टोबर 2021 – रविवार
19 ऑक्टोबर 2021 – ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलदुन्नबी/मिलाद-ए-शरीफ/बारावफात
22 ऑक्टोबर 2021 – ईद-ए-मिलाद-उल-नबी

ऑक्टोबरमधील शनिवार रविवार
3 ऑक्टोबर 2021- रविवार
9 ऑक्टोबर 2021- दूसरा शनिवार
10 ऑक्टोबर 2021- रविवार
17 ऑक्टोबर- रविवार
23 ऑक्टोबर 2021- चौथा शनिवार
24 ऑक्टोबर 2021- रविवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here