Home मुंबई ‘परळ ब्रँड’ गेला…!

‘परळ ब्रँड’ गेला…!

1009
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘परळ ब्रँड’ अशी आपली ओळख निर्माण करणारे शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.आज रात्री त्यांचे शव गोव्याहून मुंबईत आणले जाणार आहे.

रावले हे शिवसेनेकडून आत्तापर्यंत ५ वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. क्रिकेटची आवड असणारे मोहन रावले क्रिकेटमध्ये करिअर करु असणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे.लालबाग-परळमध्ये पक्षवाढीचे काम त्यांनी केले असून या भागांमध्ये शिवसेना रुजवण्याच्या कामात रावले यांचा मोलाचा वाटा होता.

शिवसेना नेवे आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली

“मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. “परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली…”.असे ट्विट करत राऊत यांनी मोहन यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here