Home समाज ‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या यूट्युबर गौरव वासन विरोधात बाबांनी केली पोलिसांकडे...

‘बाबा का ढाबा’ फेमस करणाऱ्या यूट्युबर गौरव वासन विरोधात बाबांनी केली पोलिसांकडे तक्रार

378
0

नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरातील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद मागील काही दिवसांत खूपच प्रसिध्द झाले होते. पण आता ते पुन्हा चर्चेतयेण्याचे कारण म्हणजे त्यांनी यूट्यूबर गौरव वासन याच्या विरुध्द पोलिसांकडे केलेली तक्रार. गौरवने लोकांकडून मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रसाद यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपुर्वीच 80 वर्षीय प्रसाद यांचा लॉकडाऊनकाळात व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांचा दुखीः झालेला चेहरा आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन ते प्रसिध्दीच्या झोतात आले होते. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर त्यांच्या लहानशा हॉटेलमध्ये ग्राहकांची एकच गर्दी झाली होती.

यू ट्यूबर गौरव वासनवर कोणते आरोप?
गौरव वासन यू ट्यूबर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बादामी देवी रडत आपलं दु:ख सांगताना दिसत होते. जगभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचं उत्पन्न 100 रुपयांपेक्षा कमी होतं, असं कांता प्रसाद या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत. त्यांची ही व्यथा यू-ट्यूबर गौरव वासनने कॅमेऱ्यात कैद करुन आपल्या चॅनलवर अपलोड केला होता आणि या वृद्ध दाम्पत्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबा का ढाबामध्ये एकच गर्दी झाली होती. दाम्पत्याला पैसे ट्रान्सफर करुन मदत करण्याची व्यवस्थाही झाली. परंतु गौरव वासनने यातच अफरातफर केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला. त्यांच्या माहितीनुसार, गौरवने जाणीवपूर्वक केवळ त्याचा आणि कुटुंबियांच्या बँक खात्याची माहिती शेअर करुन मोठी रक्कम जमा केली. तसंच गौरवने त्यांना कोणत्याही व्यवहाराची माहिती दिली नाही.

गौरव वासनने आरोप फेटाळले
दुसरीकडे गौरव वासनने सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्व रक्कम कांता प्रसाद यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केला होता, असा त्याने सांगितलं. मी जेव्हा हा व्हिडीओ बनवला होता, तेव्हा मला माहित नव्हतं की या व्हिडीओचा एवढा मोठा परिणाम होईल. बाबांना त्रास होऊ नये यासाठी मी माझ्या बँक खात्याची माहिती दिली, असंही तो म्हणाला. वासनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो बँक खात्याची माहिती दाखवताना दिसत आहे. त्याने फेसबुक पेजवर बँक स्टेटमेंट अपलोड करण्याचा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here