Home बीड बीडमध्ये भीषण स्फोट…!

बीडमध्ये भीषण स्फोट…!

1067
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड : बीड शहरामधील जिजामाता चौकातील एका दुकानामध्ये केमिकल कॅनचा भीषण स्फोट झाल्याची घटना आज(१८ डिसें.)दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ यांचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक सुनील गंभीर जखमी झाले आहेत.जखमी सुनील यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,पुढील तपास पोलीस करीत आहेत.नितीन भानुदास लोढा यांचे प्लायवुडचे हे गोदाम असून,याठिकाणी प्लायवुडसह फेविकॉल सह केमिकलचे कॅन ठेवण्यात आले होते.

दरम्यान,स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पो.रवी सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच बीडीडीएसचे पथक,आयबाईक,दहशदवाद पथक व श्वानपथकाने धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here