Home शिक्षण स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना ‘बी’ प्लॅन तयार ठेवावा : वर्षा ठाकूर

स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना ‘बी’ प्लॅन तयार ठेवावा : वर्षा ठाकूर

466
0

मराठवाडा साथी न्यूज
नांदेड । “सर्वसामान्य कुटूंबातील तरूणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपला ‘बी’ प्लॅन तयार ठेवला तर परीक्षेतील अपयशाने नितीधैर्य खचणार नाही. स्पर्धेत एकदा आलेले अपयश हे दूसऱ्या मिळणाऱ्या यशाची नांदी असते.” असे प्रतिपादन नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (आयएएस दर्जा) वर्षा ठाकूर यांनी केले. मराठवाडा साथीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. एक सर्वसामान्य कुटूंबातून जन्माला आलेल्या वर्षा ठाकूर यांनी आपल्या महसुली खात्यातील कामातून आयएएस दर्जा मिळविला आहे. त्यांची पहिली नियुक्ती नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या निभावत आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी सल्ला
“सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूण-तरूणींची संख्या अधिक आहे. त्यात माहितीचे अधिक स्त्रोत उत्पन्न झाल्याने कन्फ्युज (संभ्रम) अवस्थेत ही पिढी दिसते. त्यामुळे संभ्रमावस्थेत राहाण्याच्याऐवजी ‘फोकस’ ठेऊन अभ्यास करा. त्याचा निश्चित फायदा होतो. मिळालेल्या माहितीचा योग्य वापर करण्याचे तंत्र आत्मसाद करण्याचीही गरज आहे. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेत आपल्याला यश मिळत नाही.” असे त्यांनी सांगितले.
आवडीचे क्षेत्र निवडून काम करा
“पोलिस की महसुल यामध्ये आपला संभ्राम होता कामा नये. तयारी करतांना आपला फोकस स्पष्ट ठेवा. ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. ते क्षेत्र निवडले तर काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. त्यात आपली शक्तीस्थळे ओळखून अभ्यास केला तर यश निश्चित मिळते. जर ही परीक्षा पास होता नाही आली तर दूसरी परीक्षा आणि पद आपल्याकडे तयार पाहीजे. थोडक्यात ‘बी’ प्लॅन प्रत्येकाने तयार केला पाहीजे. त्यामुळे निराश होण्याची वेळ किंवा नैराश्य येत नाही.” असा सल्ला वर्षा ठाकूर यांनी दिला आहे.
इंग्रजीचा न्युनगंड ठेऊ नका
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये ग्रामिण भागातील तरूण-तरूणींचा जास्त सहभाग आहे. त्यांनी इंग्रजीचा न्युनगंड ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण सरावाने प्रत्येक गोष्ट आपल्याला आत्मसाद करता येते. हीच गोष्ट गृहीत धरून मी आता नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळेतील मुला-मुलींना इंग्रजीची भीती काढण्याचे अभियान राबविणार आहे.” असे त्या म्हणाल्या.
पीएचसी करणार सक्षम
“ नांदेड जिल्ह्यातील ग्रामिण भागात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. तर मुलींमध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. तर सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यावर आपला भर असणार आहे.” असे वर्षा ठाकूर म्हणाल्या.
टेक्नोसॅव्ही करणार बचत गट
“ महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे बचत गट टेक्नोसॅव्ही करणार आहे. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर आपला भर असेल. तर शाळेतील विद्यार्थी गळती प्रमाण रोखण्यावर भर देणार आहे. ” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांना करणार सक्षम
‘‘ मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा नांदेड आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आदिवासी भागही या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांना शाररिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यावर माझा भर असणार आहे.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here