Home आरोग्य आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत शरीराला मिळतील भरपूर लाभ

आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत शरीराला मिळतील भरपूर लाभ

594
0

आवळ्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेपासून ते केसांपर्यंत शरीराला मिळतील भरपूर लाभ
आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश आहे. यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात. तुम्ही कोणत्याही स्वरुपात आवळ्याचे सेवन केल्यास तुम्हाला केवळ लाभच मिळणार आहेत.गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा. शरीरास पोषक असणाऱ्या तसंच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळ-भाज्यांचे सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा. आकारानं छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. या फळापासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद आपण प्रत्येक मोसमामध्ये करू शकतो. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. आवळ्याची आबंट तुरट चव तुम्हालाही आवडत असल्यास यापासून तयार केलेल्या आवळा कँडी, मुरांबा, आवळ्याची चटणी अशा पदार्थांचे सेवन करू शकता. या पदार्थांपासून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. पण हे पदार्थ प्रक्रिया केलेले नसावे. जाणून घेऊया आवळ्याचे सेवनामुळे मिळणाऱ्या लाभांची माहिती.​अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावं. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक घटकांमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि मेंदू देखील शांत होतो.

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आवळ्याचा मुरांबा, आवळ्याचे चूर्ण किंवा कच्च्या स्वरुपात आवळ्याचे सेवन करावे. यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत पार पडते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत. जे आपले पोट स्वच्छ करण्याचे कार्य करतात.नियमित आवळ्याचे सेवनाने रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत सुरू राहते. कोलेस्टेरॉलचं प्रमाण देखील कमी होते.

छोट्या-मोठ्या आजारांची सहज लागण होणे म्हणजे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकुवत आहे, हे लक्षात घ्या. नियमित स्वरुपात आवळ्याच्या रसाचे सेवन करा म्हणजे इम्युनिटी वाढण्यास मदत होईल.

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे.

​डोळे आणि त्वचेचं सौंदर्य

  • व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी आवश्यक असणारा घटक आहे. आवळा हे फळ व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. या पौषण तत्त्वामुळे डोळे तसंच त्वचेचं सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. यातील जीवनसत्त्वांमुळे त्वचेतील पेशी जलदगतीनं दुरुस्त होतात.
  • व्हिटॅमिन सी आपल्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासूनही रोखण्याचे कार्य करते. यामुळे दृष्टीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
  • पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहारात आवळ्याचा समावेश करावा.

​मधासह आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करा

  • उन्हाळा तसंच पावसाळ्यात बाजारात आवळा उपलब्ध नसल्यास तुम्ही आवळा कँडी किंवा आवळ्याच्या मुरांब्याचे सेवन करू शकता. पण मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी या गोष्टींचे सेवन करणं टाळावं. कारण हे पदार्थ तयार करताना त्यामध्ये साखरेचा वापर केला जातो.
  • निरोगी आरोग्यासाठी आवळा पावडर मधासह सेवन करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य प्रमाणात याचे सेवन करावे. वय आणि आरोग्यावर सेवनाची मात्रा अवलंबून असते.

​केसांचे सौंदर्य

  • सुंदर आणि चमकदार केसांसाठी तुम्ही आवळा खाऊ शकता किंवा आवळा पावडरचा हेअर मास्क म्हणून देखील वापर करू शकता. या दोन्ही पद्धतींमुळे तुमचे केस मजबूत होण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात आवळ्याचे सेवन केल्यास केसांच्या समस्या कमी होऊ शकतात.
  • आवळ्यातील गुणधर्मांमुळे केस काळे राहतात तसंच कोंड्याची समस्याही कमी होते.
  • फ्रीजमध्ये ठेवलेल्या आवळ्याचे सेवन करणं टाळा. यामुळे आरोग्यास अपाय होण्याची शक्यता असते.

​मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत
बदलत्या जीवनशैली तसंच ताणतणावामुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी आवळ्याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आवळ्यामधील अँटी-ऑक्सिडेंट्समुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यात मदत मिळते. आवळा ज्यूस किंवा आवळा चूर्णाचे हळदीसोबत सेवन केल्यास भरपूर लाभ मिळतील. पण कोणतेही उपाय करून पाहण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here