Home समाज आवगोच होळीरो सण

आवगोच होळीरो सण

177
0

होळी हा भारतातील एक मुख्य आणि प्राचीन सण आहे.होळीला रंगांचा सणही म्हणतात, हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो.होळीचा सण २ दिवस साजरा केला जातो, पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, तर दुसर्‍या दिवशी रंग खेळून धुलीवंदन साजरे केले जाते.या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात.पण काहीशी प्राचीन काळापासून दर्‍याखोर्‍यात वावरणार्‍या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे.प्रेमळ,निखळ आनंद देणारी ,थोडी चावट ,पण तारुण्य बहाल करणारी तांडयात चैतन्य निर्माण करणारी होळी गोरगणात आजही तमाम तांड्यात खेळल्या जाते हीच बंजारा समाजाची फार मोठी संस्कृती आहे.अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्यांमध्ये बंजारा समाज विखुरलेला आहे. वर्‍हाडातील या पाचही जिल्हयातील बंजारा समाजातील होलीकोत्सव अतिशय आगळया- वेगळया स्वरुपात फाल्गूनात सपन्न होतो. होळी हा सण बंजारा समाजासाठी महत्वाचा सण आहे. होळीमध्ये लेंगी गीत गायल्या जाते. लेगी गीतांमध्ये होळीचे वर्णन केलेले असते. या लेंगी गीतांवर स्त्री-पुरुष गोलाकार वर्तुळात नाचत असतात. लहान मुलांपासून तर वृध्दमाणसांबरोबर या उत्सवात लेंगी गीत गात-गात नृत्यही सादर करतात. तीन दिवस हा उत्सव गावातील तांडयावर चाललेला असतो. प्रत्येक तांडयावर होळीचे रंग उधळले जातात. इतर समाजामध्ये होळी ही आधल्या दिवषी सायंकाळी पेटते परंतू बंजारा समाजातील होळीची विषेशतः म्हणजे यांची होळी दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणजे धुलीवदनाच्या दिवशी होळी पेटवली जाते. गावकर्‍याच्या सामुहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दिसून येते. समाजाची प्रगती साधण्यासाठी व बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा उत्सव, बंजारा समाजाच्या जीवनाचे अंग ठरला आहे.याबरोबरच अनेक रुढी परंपरा साजरा केल्या जातात.हारेर लकडा हा यादिवशीचा महत्वाचा खेळ. लोखंडी खांबाला तेल लावून त्याच्या वरच्या टोकाला साखरेच्या गाठ्या आणि बक्षिसाची रक्कम ठेवली जाते. खांबाभोवती गेरणी बंजारा महिला झाडाच्या ओल्या फांद्या घेऊन उभ्या राहतात अन त्या खांबावर चढू पाहणाऱ्या गेरियाला झोडपून काढतात. या दिवशी घरोघरी जाऊन फाग म्हणजे प्रथेनुसार देणगी मागून मग त्यातून नायकाच्या घरी प्रसाद केला जातो.तसेचबाळाची ‘धुंड’ साजरी केली जाते.वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा ‘धुंड’ (वाढदिवस) साजरा करतात. घरी मुलगा झाल्यावर साजरा केलेला आंदोत्सव म्हणजेच धुंड.या वेळी सर्व गावकऱ्यांना गोडधोड देवुन आनंद साजरा केला जातो.विषेश म्हणजे बंजारा समाजात होळीत महिलाना विषेश स्थान दिल जात हे मनाला सुखावून टाकणारी परंपरा आहे.अशी असते आगळीवेगळी बंजारा होळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here