Home मनोरंजन रणबीर आलिया “pass pass”

रणबीर आलिया “pass pass”

523
0

रणबीरच्याच अपार्टमेंटमध्ये आलियाचा 32 कोटींचा नवा फ्लॅट

मुंबई : आलिया भटने बांद्र्याच्या पाली हिल भागात नवा फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटची किंमत आहे 32 कोटी रुपये.आलिया भटने घेतलेला हा नवा फ्लॅट पाली हिलच्या वास्तू या अपार्टमेंटमध्ये आहे. तब्बल दोन हजार चारशे साठ चौरस फुटांचा हा फ्लॅट आहे या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर. तर याच अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर रणबीर कपूरचा फ्लॅट आहे. आलियाने हा फ्लॅट घेतल्यानंतर त्याचं इटेरिअर गौरी खानला करायला दिलं आहे. योगायोग असा की रणबीर कपूरच्या फ्लॅटचं इटेरिअरही गौरी खाननेच केलं आहे. आलिया भटची सध्या दोन घरं आहेत. एक जुहूला तिने बंगला घेतला आहे. तर लंडनमध्येही तिचं एक घर आहे. आता या फ्लॅटमुळे या संख्येत आणखी एकाने भर पडली आहे.

त्यामुळे आता रणबीर आणि आलिया आता शेजारी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here