Home क्रीडा अश्विन ने आपली जागा पुन्हां मिळवली…

अश्विन ने आपली जागा पुन्हां मिळवली…

316
0

आयसीसीने नुकताच कसोटी गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात भारतीय संघातील उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आर अश्विननी मोठी झेप घेतली .

काही दिवसांपूर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत आर अश्विन आणि जेम्स अँडरसन संयुक्तरित्या अव्वल स्थानी होते. मात्र आता आर अश्विनने जोरदार कामगिरी करत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले.

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन ८६९ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन ८५९ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे.

टॉप १० मध्ये ३ भारतीय गोलंदाज..

आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या यादीत ३ भारतीय गोलंदाज आहेत. आर अश्विन अव्वल स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह सातव्या आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा नवव्या स्थानी आहे.

नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील ४ कसोटी सामन्यांमध्ये आर अश्विनने २५ गडी बाद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here