Home अपघात बातमी कोलंबियात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

कोलंबियात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

252
0

कोलंबियाच्या पश्चिमेकडील क्विब्डो शहरात अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करी हेलिकॉप्टर पुरवठा ऑपरेशन करत होते. मात्र, उंचावर असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते खाली कोसळले. दि २० रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी ते नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून आले.
कोलंबियाचे राष्ट्राअध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ट्विटरवर या घटनेची पुष्टी केली आणि अपघाताच्या ठिकाणी आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्याचे सांगितले. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि दोन क्रू मेंबर्स होते. यातील दोन जणांनी हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी उड्या मारल्या असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, कोलंबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हेक्टर मॉरिसिओ जेरेझ ओचोआ हे बुमंग्यूजचे राष्ट्रीय लष्कराचे पायलट होते. ज्युलिथ गार्सिया ही UH 1N हेलिकॉप्टर उडवणारी कोलंबियन नॅशनल आर्मीमधील तिच्या श्रेणीतील सर्वात वरिष्ठ महिला अधिकारी होती. ही महिला मूळची कुकुटा, नॉर्टे डी सांतांडे येथील रहिवासी होती आणि विशेषतः प्रगत लढाई, स्कायडायव्हिंग यांमध्ये कुशल होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here