Home क्रीडा अर्जुनचे ‘पदार्पण’…!

अर्जुनचे ‘पदार्पण’…!

408
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबईसाठी पदार्पण केले आहे.सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी च्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली असून ऑलराऊंडर असलेला अर्जुन डावखुरा फास्ट बॉलर आणि बॅट्समन आहे. याअगोदर अर्जुनने मुंबई अंडर-१९,इंडिया अंडर-१९ कडून श्रीलंकेविरुद्धदिवसांची मॅच खेळली आहे.तसेच अर्जुनने टीम इंडियाला नेटमध्ये बॉलिंग करून सरावही दिला होता.दरम्यान,मुंबईच्या सिनियर टीममध्ये पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here