Home महाराष्ट्र मुंबई, रत्नागिरी, देवगडच्या किनाऱ्यांवर “Blue Tide “

मुंबई, रत्नागिरी, देवगडच्या किनाऱ्यांवर “Blue Tide “

648
0

मुंबई : महाराष्ट्राच्या काही समुद्र किनाऱ्यांवर ब्लू टाइड (Blue Tide) दिसून आली आहे. मुंबईची जुहू चौपाटी, रत्नागिरीचा समुद्रकिनारा, देवगड इथेही ही चमचमती निळाई दिसून आली. ‘ब्लू टाइड’म्हणून ओळखली जाणारी ही घटना खूप दुर्मिळ आहे. यामुळे या काही किनाऱ्यांवर निळ्या रंगाच्या छटा दिसून आल्या आहेत.

ब्लू टाइड हा प्रकार एका प्रकारच्या समुद्री वनस्पतीमुळे. विभागीय हवामान विभागाच्या मुंबईमधील जुहू, देवगड आणि रत्नागिरीच्या किनाऱ्यावर चमचमत्या निळा लाटा दिसल्या ते फायटोप्लांक्टनमुळे. फाइटो प्लांकटन (phytoplankton) एक प्रकारची समुद्री वनस्पती आकाराने खूप मोठी झाल्यास त्यातून एकप्रकारचं रंगद्रव्य किंवा टॉक्सिन बाहेर पडतं. यामधून निळ्या रंगाच्या छटा तयार होतात. या ब्लू टाइड खूप घातक आहेत. मानव, मासे, शेलफिश आणि इतर समुद्री प्राण्यांसाठी या ब्लू टाइड घातक आहेत. हे नुकतेच काही किनारपट्टी भागात पाहिले गेले आहेत.

समुद्र वैज्ञानिकांच्या मते, फायटोप्लॅक्टनला सामान्यपणे डाइनोफ्लॅगलेट्स म्हणून ओळखलं जातं. यांच्या प्रोटिनमध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांद्वारे सौम्य वातावरण तयार होते. यामधून निळ्या लाटा तयार होत असून युनिसेल सेल्युलर सूक्ष्मजीवांना त्रास होतो. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे सल्लागार आणि वैज्ञानिक ई. विवेकानंदन यांच्या मते नोव्हेंबर आणि डिसेंबर 2016 नंतर पश्चिम किनारपट्टीवर अशी घटना पहिल्यांदा पहिली गेली आहे. या कालखंडात सूक्ष्म समुद्री वनस्पती लूसिफ़ेरेज़ एक प्रोटिन सोडते. यामधील रासायनिक प्रक्रियेमधून एक शृंखला तयार होते. यामुळे समुद्रामध्ये अशा प्रकारची निळ्या रंगाच्या झगमगत्या लाटा तयार होतात. या घटनांमध्ये मुख्य कारण यूट्रोफिकेशन आहे. यामध्ये समुद्राच्या पाण्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होणं. फाइटोप्लांकटनवर याचा जास्त प्रभाव पडत असल्याने या लाटा तयार होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here