Home बीड शिवसेनेने रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला

शिवसेनेने रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शिवसेना मैदानात.

889
0

माजलगाव : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांनी विरुद्ध आदेश काढून नवीन जुलमी कायदा लागू केल्यामुळे दिल्लीत व भारतभर शेतकरी केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध पेटून उठलेला असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करत या आंदोलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याची टीका केली व काही भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी आतंकवादी म्हटल्यामुळे शिवसेनेने आक्रमक होत रावसाहेब दानवे यांचा पुतळयाचे दहन केले.
केंद्र सरकार विरुद्ध सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून त्यातच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव,सह संपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ डिसेंबर शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंत्री रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध करण्यात आला व रास्ता रोको करण्यात आला, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शिवसेना सातत्याने संघर्ष करत आलेली आहे आणि आताही शेतकऱ्यांच्या हितासाठी मैदानात उतरली असल्याचे मत आप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
शेतकरी विरोधी काळा कायदा व पेट्रोल-डिझेलची दरवाढीचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उप तालुकाप्रमुख नामदेव सोजे,संजय शिंदे ,अतुल उगले,संभाजी पास्टे,नारायण तौर ,लक्ष्मण महागोविद,नीतीन शिंदे ,प्रल्हाद घाटुळ,भरत पास्टे,जयराम राऊत,करण थोरात,विठ्ठल चव्हाण,महादेव थावरे,माऊली भोसले,गजानन गीराम,महादेव पायघन,शरद पायघन,शुभम डाके,बाबासाहेब कोळसे,बळीराम खील्लारे, कल्याण मोहीते, दादा मोहीते,श्रीराम सावंत,दादा रन्दे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here