Home मनोरंजन कंगनाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल

कंगनाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल

4
0

मुंबई । न्यायपालिकेविरूद्ध अपमानजनक ट्वीट केल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रणौतविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर गुरुवारी ही फौजदारी तक्रार दाखल केली.
यापूर्वी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून कंगना व तिची बहीण रंगोलीविरुद्ध तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी कंगना रणौत आणि तिच्या बहिणीला पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे.
अंधेरी कोर्टात अभिनेत्रीविरोधात वकील अली कासिफ खान देशमुख यांनी देशद्रोह आणि तिच्या ट्वीट्समधून धार्मिक वाद निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ही अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदा आणि अधिकृत सरकारी संस्था यांचा आदर करत नाही आणि तिने न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here