Home क्राइम वऱ्हाडी बनून आला अन् वधूच्या आईची बॅग चोरुन पळाला

वऱ्हाडी बनून आला अन् वधूच्या आईची बॅग चोरुन पळाला

47
0


चंदीगढ । पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात वऱ्हाडी बनून आलेल्या एका व्यक्तीने वधूच्या आईची बॅग चोरी केली व घटनास्थळावरुन फरार झाला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
माहितीनुसार, बॅगमध्ये साडेतीन लाख रुपये, 2 मोबाइल फोन, डायमंडचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. लग्नाच्या कार्यक्रमातून बॅग अशा प्रकारे चोरी झाल्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. तक्रारदार उषा ठाकूर यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांची बॅग चोरीला गेली. या बॅगमध्ये दागिन्याबरोबरच अहेराचे पैसही होते. तक्रार आणि प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि शेजारच्या राज्यांतील पोलिसांना फुटेज व छायाचित्रे पाठविली आहेत जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर अटक करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here