Home मनोरंजन सोनू सूद राजकारणात येणार?

सोनू सूद राजकारणात येणार?

99
0

सोनू सूद हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हिंदीबरोबरच त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगारांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

त्यानंतर सोनू सूद चर्चेत आला होता. सोनूच्या राजकीय पदार्पणाबाबतही चर्चा रंगल्या होत्या.

सोनू सूदने नुकतीच ‘एएनआय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राजकीय पदार्पणाबाबत भाष्य केलं. राजकारणात पदार्पण करण्याबाबत सोनूला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सोनूने उपमुख्यमंत्री व खासदार पदासाठी ऑफर मिळाल्याचा खुलासा केला आहे. सोनू म्हणाला, “राजकीय पदार्पणाबाबत बोलायचं झालं तर मला राज्यसभेचा खासदार होण्याची ऑफर मिळाली होती. पण मी ती नाकारली”.

https://www.instagram.com/p/Cpo9rlKIvEy/?utm_source=ig_web_copy_link

“याबरोबरच मला अजून काही पदांच्याही ऑफर मिळाल्या होत्या. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री पदाचीही ऑफर मला देण्यात आली होती”, असंही सोनू सूद म्हणाला. “मला खूप गोष्टींची ऑफर मिळाली आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे मला उत्साह मिळत नाही. मी स्वत: माझ्यासाठी नियम बनवतो. कारण, कोणीतरी बनवलेल्या रस्त्यावर चालायला मला आवडत नाही”, असंही सोनू सूदने सांगितलं.

सोनू सूदने अनेक हिट चित्रपटांत काम केलं आहे. जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. ‘फतेह’ चित्रपटातून सोनू सूद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here