Home शिक्षण २,३२० जागांसाठी‎ सहा दिवसांत २,६८३ अर्ज :आरटीई

२,३२० जागांसाठी‎ सहा दिवसांत २,६८३ अर्ज :आरटीई

203
0

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत‎ समाजातील दुर्बल घटकांसाठी २५‎ टक्के प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू‎ आहे. जिल्ह्यातून सहा दिवसांत २‎ हजार ६८३ अर्ज आले आहेत. अर्ज‎ करण्यासाठी शेवटची तारीख १७‎ मार्च आहे. तोपर्यंत आणखी अर्ज‎ येण्याचा अंदाज आहे.‎ प्रतिकूल सामाजिक किंवा‎ आर्थिक स्थितीमुळे मुले-मुली‎ शिक्षणापासून वंचित राहू नयेत‎ म्हणून शिक्षण हक्क‎ कायदा‎‎‎ (आरटीई) आणला गेला.‎ त्याअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या‎ शाळांमध्ये‎ आर्थिक व दुर्बल‎‎‎ घटकांतील‎ मुलांसाठी २५ टक्के‎ प्रवेशासाठी जागा‎‎ राखीव‎ असतात.‎

शालेय शिक्षण‎‎‎ विभागातर्फे‎ आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश‎ प्रक्रिया सुरू आहे. अर्ज आॅनलाइन ‎ ‎ करायचे आहेत. यंदा आरटीई‎‎ अंतर्गत जिल्ह्यातील २९५ शाळांनी‎‎ नोंदणी केली आहे. या शाळांत‎ २३२० जागा‎ आहेत. शहरात १७‎ शाळा असून ३२४ जागा आहेत.‎ जिल्ह्यात २६८३‎ विद्यार्थ्यांचे‎ ऑनलाइन अर्ज सादर‎ झाले आहेत.‎ १७ मार्च रोजी रात्री बारा‎ वाजेपर्यंत‎ पात्र विद्यार्थ्यांना‎ ऑनलाइन पद्धतीने ‎ ‎ अर्ज सादर‎ करावयाचा असून अर्ज ‎ ‎ भरताना‎ अडचणी आल्यास शिक्षण‎ ‎ ‎ विभागाशी संपर्क साधावा, असे‎ ‎ ‎ आवाहन शिक्षण विभागाच्या ‎ ‎ माध्यमातून‎ केले आहे.‎‎

यंदा प्रवेशासाठी राज्य स्तरावरून ‎ ‎ एकच सोडत जाहीर होईल.‎ एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास‎ एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य‎ धरला जाणार नाही. त्यामुळे एकच‎ अर्ज व्यवस्थित भरावा लागणार‎ आहे. पालकांना दहा शाळा पर्याय ‎ ‎ म्हणून निवडता येणार आहेत. ‎ ‎ अर्जप्रक्रिया ऑनलाइनच करायची ‎ ‎ आहे, असे िवभागाने स्पष्ट केले.‎

आरटीई प्रवेशासाठी सात‎ दिवसांत अडीच हजाराहून‎ अधिक जणांनी अर्ज दाखल‎ केलेले आहेत. ऑनलाइन अर्ज‎ दाखल करण्यासाठी शिक्षण‎ विभागाकडून दोन वेबसाईट‎ कार्यरत केल्या आहेत. आता‎ वेबसाइटवर लोड येणार नाही.‎ तसेच १७ मार्चपर्यंत मुदत‎ असल्यामुळे प्रवेश अर्ज दाखल‎ करण्यापासून कोणीच वंचित‎ राहणार नाही.’’‎ संजय जावीर, शिक्षणाधिकारी‎

अर्ज भरण्यासाठी आणखी एक संकेतस्थळ‎ शिक्षण हक्क कायद्या तील २५ टक्केअंतर्गत नोंदणी करण्यास १ मार्चपासून सुरुवात‎ झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता. मात्र दुसऱ्या‎ दिवसापासून‎ नोंदणीसाठी पालकांनी‎ गर्दी केल्याने संकेतस्थळ हँग होऊ‎ लागले होते. पालकांनी‎ लेखी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभाग व एनआयसी विभागाने‎ आणखी एक‎ नव्याने संकेतस्थळ‎ सुरू केले आहे.

https://rte25admissi ‎on. maharashtra.‎ gov.in‎/adm_portal /Users/rteindex‎ या संकेतस्थळावरूनही पालकांना‎ अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळ मंद झाल्यास काही वेळाने प्रयत्न करता येते.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here