मराठवाडा साथी न्यूज
कोल्हापूर : सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांना लुटणाऱ्या टोळीचे नाव आता कोल्हापूर पोलिसांच्या समोर आले आहे.या प्रकरणात कोल्हापूर मधील एका तरुणाची त्याच्या चुलत मामानेच फसवणूक केल्याचे समोर आले आहे.या तरुणाची ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून,त्यासाठी आसाममध्ये खोटी परीक्षा घेऊन सैन्य भरतीची बनावट कागदपत्रही देण्यात आली होती.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाच्याने पोलिसांत तक्रार केली.तक्रारीनंतर मामा दत्तात्रय सुतार आणि त्यांचा साथीदार शिवाजी कदम यांना पोलिसांनी अटक करण्यात आले.
दरम्यान,पोलिसांच्या माहितीनुसार अशी कोणतीही रेजिमेंट नसून,भरती चुकीच्या पद्धतीने झाल्याचे लक्षात येताच काही तक्रारदारांच्या सांगण्यावरुन करवीर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हाती एक- दोन व्यक्तींची नावे समोर आली आहेत. परिणामी हे या रॅकेटचे मूळ कुठे आहे याचा तपास केला सुरु आहे.