मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : ‘द फॅमिली मॅन’ हि वेब सिरीज फारच गाजली असून प्रेक्षक या वेबसिरीजच्या ‘सिझन-२‘ ची आतुरतेने वाट बघत आहेत.या वेबसिरीजच्या पहिल्या सिझन मध्ये बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांनी गुप्तहेराची भूमिका आकारली आहे.मनोज यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले आहे.आता या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सिझनची उत्सुकता वाढतच चालली आहे.
दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी या दुसऱ्या सिझनची भेट देण्याचा विचार या वेबसिरीजच्या निर्मात्यांनी केला आहे.लवकरच निर्माते या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या प्रिमियरची तारीख सोशल मीडियावर जाहीर करुन या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा दुसरा सिझन पुढील वर्षात फ्रेब्रुवारीमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.