Home मराठवाडा दै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा

दै.मराठवाडा साथीच्या परळी भुषण पुरस्कारांची लवकरच घोषणा

366
0

पुरस्कार वितरण व बाल धमाल बक्षीस वितरण लवकरच होणार
परळी – दै.मराठवाडा साथीच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणार्‍या परळी भुषण पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असून पुरस्कार व बाल धमाल स्पर्धेचे बक्षीस वितरण यांचीही तारिख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग लक्षात घेऊन व शासकीय नियमांच्या अधिन राहत अद्यापही शैक्षणिक संस्था पुर्ण विद्यार्थी संख्येने सुरु झालेल्या नसल्याने प्रत्यक्ष होणारी बाल धमाल स्पर्धा 2021 या वर्षी ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. या स्पर्धेला राज्यभरातून स्पर्धकांचा प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेकडे विद्याथी, शिक्षक व पालकांची लक्ष लागले असून बक्षीस वितरणाची तारिख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा परळी भुषण पुरस्कार सोहळाही काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच पुरस्कार निवड समितीच्या वतीने पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार असून पुरस्कार व स्पर्धेचे बक्षीस वितरण यांची तारिखही जाहीर करण्यात येणार आहे. दरवर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली जातात. परंतु कोरोना संसर्ग लक्षात घेऊन नियम व अटींचे पालन करीत कार्यक्रम करायचा असल्याने त्याची तारिख लवकरच जाहीर केली जाईल.

ना.धनंजय मुंडे आज भेट देणार
दै.मराठवाडा साथी वर्धापन दिनानिमित्त बीड येथे आज 26 जानेवारीला शुभेच्छांचे आदान-प्रदान जिल्हा कार्यालयात होत असून येथे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजय मुंडे भेट देणार आहेत. मागील अनेक वर्षापासून ते आवर्जुन या कार्यक्र्रमास उपस्थित राहतात. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार असल्याचा शासकीय कार्यक्रम प्रसिद्धीस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here