Home इतर ३ जवान शहीद :छत्तीसगडमध्ये जवानांच्या ताफ्यावर माओवाद्यांचा हल्ला

३ जवान शहीद :छत्तीसगडमध्ये जवानांच्या ताफ्यावर माओवाद्यांचा हल्ला

825
0

छत्तीसगड: गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी दोन जवानांची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता छत्तीसगडमध्ये हल्ला केला आहे. जवानांवर माओवाद्यांनी हल्ला केला असून ३ जवान शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कुंदेडजवळ ही घटना घडलीआहे . सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. आश्रम पारा जगरगुंडा येथे माओवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केला . पोलीस जवान ऑपरेशनसाठी निघाले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले . या चकमकीत ३ जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे एएसआय रामुराम नाग, असिस्टंट कॉन्स्टेबल कुंजम जोगा, शिपाई वंजम भीमा अशी सांगण्यात येत आहे.दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते .गोंदिया जिल्ह्याच्या सीमेपासून ६०० मीटर अंतरावर छत्तीसगडच्या राजनांदगांव जिल्हयाच्या हद्दीत माओवाद्यानी नाकाबंदीत असलेल्या दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार केले होते .घटनास्थळ बोरतलाब ता.पु. जि. राजनाडगाव, छत्तीसगडच्या नाक्यावर हल्ल्यात सीजी पोलिसांचे ०२ पोलीस जवान शहीद झाले. राजेश सिंग (हेड कॉन्स्टेबल), ललित यादव (कॉन्स्टेबल) अशी शहीद झालेल्या जवानांची नाव आहे. जवानांची हत्या केल्यानंतर माओवाद्यांनी त्याच्या मोटरसायकलीही जाळल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here