Home मनोरंजन आश्चर्यजनक! शेतकऱ्याने केले कुत्र्याला ‘वारसदार’…!

आश्चर्यजनक! शेतकऱ्याने केले कुत्र्याला ‘वारसदार’…!

450
0

मराठवाडा साथी न्यूज

भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बाडीबाडा गावात ओम नारायण या शेतकऱ्याने आपली २ एकर जमीन चक्क आपल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नाकारत त्याच्या पाळीव कुत्र्याला आपला ‘वारसदार’ घोषित केले आहे.त्यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.विशेष म्हणजे कायदेशीरित्या शपथ पत्रावर त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला आपला ‘वारसदार’ म्हणून घोषित केले आहे.

ओम नारायण यांनी आपल्या मृत्यूपत्रात म्हंटले आहे की,’माझी सेवा पत्नी आणि पाळीव कुत्रा करतो त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत तेच माझ्यासाठी सर्वात प्रिय राहतील. माझ्या निधनानंतर माझी संपूर्ण जमीन-मालमत्तेचे अधिकार पत्नी चंपा वर्मा आणि पाळीव कुत्रा जॅकी यांच्याकडे असतील.सोबतच, कुत्र्याची सेवा करणाऱ्याला मालमत्तेचा पुढचा वारसदार मानले जाईल’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here