Home मराठवाडा अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद !

अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद !

110
0

बीड : गेल्या आठ दिवसापासून तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असून पहाटे हा बिबट्या सावरगाव वन भागात जेरबंद झाला .
या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर, पुणे ,जळगाव औरंगाबाद, बीड यांची पथके नेमण्यात आली होती. आज पहाटे हा बिबट्या अलगद आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या सावरगाव हद्दीत आला होता .
त्याने या पिंजऱ्यातील अर्ध्या बोकडाचा फडशा पाडल्यानंतर तो या पिंजऱ्यात अडकला .बिबट्याला जेरबंद केल्यामुळे वन विभागाचे टेन्शन दूर झाले असून नागरिकांची भीती दूर होण्यास मदत होणार आहे.
शिरापूर च्या डोंगराच्या वरच्या बाजूला सावरगाव वन विभागाची हद्द आहे .या बिबट्याचा वावर हा शिरापूर ,करडवाडी,सावरगाव असा होता .
शिरापूर येथील सार्थक संजय बुधवंत या 4 वर्षाच्या चिमुकल्याची दोन दिवसांपूर्वी बिबट्याने आईसमोर उचलून नेऊन हत्या केली.
तसेच यापूर्वी केळवंडी आणि मढी येथील दोन बालकांचा या बिबट्याने जीव घेतला आहे.त्यामुळे हा बिबट्या नरभक्षक बनला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here