Home मुंबई परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार : राणे

परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार : राणे

624
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. ‘जे परीक्षेला बसत नाहीत आणि पासही होत नाहीत, त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?,’ असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

पालघरमधील साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘जन आक्रोश यात्रा’ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या यात्रेला परवानगी नाकारत राम कदम यांना ताब्यात घेतले व सोडून दिले. कदम यांच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी नारायण राणे यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ‘शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. हिंदुत्व ही उद्धव ठाकरेंची विचारसरणी नाही. ते तडजोड करणारे आणि पदासाठी हवं ते करणारे आहेत. शिवसेना व हिंदुत्व हे समीकरण जुळणारं नाही,’ असं राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here