Home शहरं अखेर शेतकऱ्यांना मिळाली ‘बुराडी’ मैदानात आंदोलनाची परवानगी…!

अखेर शेतकऱ्यांना मिळाली ‘बुराडी’ मैदानात आंदोलनाची परवानगी…!

358
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : दिल्लीतल्या ‘बुराडी मैदानात’ शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मात्र, या मैदानाच्या बाहेर कुठेही जाण्यास आंदोलकांना बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांची नजर शेतकऱ्यांवर कायम राहणार आहे.मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे.जवळपास ५ लाख आंदोलकांचा यात सहभाग असल्याचं शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.आपण कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्यास तयार असल्याचेही शेतकऱ्यांनी आश्वासन दिलंय. बुराडी मैदानातही मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here