Home मनोरंजन सुशांतच्या वाढदिवशी बहीण श्वेताने केली २५ लाखांच्या स्कॉलरशीपची घोषणा

सुशांतच्या वाढदिवशी बहीण श्वेताने केली २५ लाखांच्या स्कॉलरशीपची घोषणा

174
0

कॅलिफोर्निया विद्यापीठात अ‍ॅस्ट्रोफिजिक्स शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांच्या स्कॉलरशिपची घोषणा

मुंबई : आज दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 35 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी त्याची बहीण श्वेताने खास स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (Astrophysics) शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांची स्कॉलरशिप मिळणार आहे.

श्वेताने आपल्या इन्स्टाग्रामवर यासंबंधी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुशांतचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हा पुढाकार घेतल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंहच्या इ्न्स्टाग्राम पोस्टचे फोटो टाकत कॅलिफोर्निया विद्यापीठातील अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विभागात 35 हजार डॉलरचा सुशांतसिंह राजपूत मेमोरियल फंड उभारण्यात आला आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क साधावा. हे काम शक्य करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करते की तू जिथे असशील तिथे आनंदी असशील, असा मेसेज लिहिला आहे.

काही दिवसांपूर्वी श्वेता सिंहने सुशांतसिंह राजपूत याने आपल्या हाताने लिहिलेली एक नोट पोस्ट केली होती. यामध्ये त्याने, मी माझ्या आयुष्यातील सुरुवातीची 30 वर्ष काहीतरी बनण्यात घालवली. मला प्रत्येक गोष्टीत उत्तम व्हायचं होतं. मला टेनिसमध्ये चांगलं व्हायचं होतं, शाळेत चांगले मार्क देखील मिळवायचे होते. यासाठी मी त्याच दृष्टीने इतके वर्ष प्रयत्न करत होतो. मी जसा आहे तसा ठीक नाही, परंतु जर मला चांगल्या गोष्टी मिळाल्या तर…, अशा भावना सुशांतने या नोटमधे व्यक्त केल्या होत्या.

https://www.instagram.com/p/CKR-a49FZE0/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here