Home लाइफस्टाइल १२ हजार ६३८ हिऱ्यांची अंगठी……

१२ हजार ६३८ हिऱ्यांची अंगठी……

892
0

“द मेरिगोल्ड डायमंड रिंग “- १३८ पाकळ्यांचे १२,६३८ हिरेजडित ८ थर,गिनीज बुकमध्ये नोंद

हर्षित बन्सल यांनी मोडला हैदराबाद येथील श्रीकांत यांचा 7801 हिऱ्यांच्या अंगठीचा विक्रम

मेरठ : भारतीय ज्वेलर हर्षित बन्सल यांनी १२,६३८ हिऱ्यांच्या अंगठीची निर्मिती करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ही अंगठी तयार करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. या यशाची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्याने मेरठ येथील सराफ बाजार जागतिक स्तरावर पोहोचला आहे. नुकताच हर्षित यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत अंगठीचा फोटो शेअर केला आहे.

30 नोव्हेंबर 2020 ला त्यांनी या जागतिक विक्रमाची नोंद केली. हर्षित हे जगातील असे एकमेव व्यक्ती बनले आहेत की ज्यांनी एक अंगठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांचा वापर करुन सजवली आहे. या अंगठीत 8 स्तर असून त्यातील 138 पाकळ्यांवर हिरे बसवण्यात आले आहेत. हर्षित यांनी या अंगठीचे डिझाइन तयार केले तर सूरतमध्ये कंपनीच्या 28 कर्मचाऱ्यांनी ही अंगठी तयार केली आहे.

द मेरिगोल्ड डायमंड रिंग नावाच्या या अंगठीचे वजन 165.450 ग्रॅम असून हिऱ्यांचे वजन 38.08 कॅरेट आहे. 18 कॅरेट शुध्द सोन्यात ही अंगठी साकारण्यात आली आहे. अंगठीला 8 स्तर असून 138 पाकळ्यांचे आकार देण्यात आले आहेत. प्रत्येक स्तर हा हिरेजडीत आहे. यातील सगळे हिरे एकाच आकाराचे आहेत. या अंगठीचा आकार 3 इंच रुंद आणि 1.75 इंच उंच आहे. महिला ही अंगठी आरामात वापरु शकतात, असे हर्षित यांचे म्हणणे आहे.

25 वर्षांचे हर्षित यांनी मेरठ येथील दागिन्यांना जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here