Home बीड परळीत द ग्रेट टॅलेंट शो राज्यस्तरीय स्पर्धा

परळीत द ग्रेट टॅलेंट शो राज्यस्तरीय स्पर्धा

573
0

कलाकारांना राज्यव्यापी संधी मिळणार -शशी मुखीजा

परळी l प्रतिनिधी
राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत व दै.मराठवाडा साथी आयोजित द ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेचे परळीत आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे. बुधवार दि.04 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. दि इंडिया सिमेंट लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशि मुखिजा, प्रताप सलूनचे संचालक प्रताप घोडके राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्ष बालचंद लोढा, कोषाध्यक्ष विजय सोनी, सह सचिव ओमप्रकाश झंवर, विश्वस्त कांताप्रसाद झंवर, प्रेमा बाहेती, प्रविण किरणजी लड्डा, पोदार स्कुलचे प्राचार्य बी. पी. सिंह, बचपन स्कुलच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती आदींची उपस्थिती होती.
उदघाटन समारंभानंतर बोलतांना दि इंडिया सिमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशी मुखीजा म्हणाले की, कलाकारांच्या कलेला या स्पर्धेच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ मिळाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे सर्वकाही ठप्प होते. कुठलेही कार्यक्रम किंवा स्पर्धा झाल्या नाहीत, त्यामुळे कलाकारांच्या कलेला वाव मिळाला नाही. परळी शहरात घेण्यात येत असलेल्या या राज्यव्यापी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलं राज्याच्या स्तरावर झळकणार आहेत असा विश्वास वाटतो असे ते म्हणाले.


कोरोना लॉकडाऊन नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर एखाद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. द ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेत कोणत्याही कलेने निपुण असलेल्या स्पर्धकांना सहभागी होता येत आहे. तीन दिवस ऑडिशन आणि शेवटच्या दिवशी फायनल राउंड व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. गायन, वादन, कला, डान्स, मेहंदी, स्टाईल आदींसह विविध क्षेत्रातील कलाकारांना या स्पर्धेमुळे राज्यव्यापी संधी मिळणार आहे. राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार करण्यात येत आहे. पुढील 08 नोव्हेंबर पर्यंत सदरच्या स्पर्धांचे ऑडिशन सुरू राहणार आहेत. दि इंडिया सिमेंट कंपनी व प्रताप सलून यांनीही स्पर्धेचे प्रायोजकत्व घेण्यात आले आहे. दै.मराठवाडा साथी व मराठवाडा साथी पीसीएन न्यूजसुद्धा या स्पर्धेचे मीडिया पार्टनर आहेत. पहिल्या दिवशी उदघाटन सत्रानंतर स्पर्धांन सुरुवात करण्यात आली. 1 ते 6 व 16 ते 25 वयोगटातील स्पर्धकांचे ऑडिशन घेण्यात आले. पहिल्या दिवसाच्या स्पर्धांचे परीक्षक म्हणून संजय सुरवसे, सौ.मधु सिंह, सौ.स्वाती देशमाने यांनी काम पाहिले.

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण!
राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथी यांच्या संयुक्त विद्यमाने परळीत सुरू असलेल्या द ग्रेट टॅलेंट शो स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली. हा कार्यक्रम दि.09 नोव्हेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मराठवाडा साथी पीसीएन न्यूजवर थेट प्रक्षेपण
परळीत सुरू असलेल्या द ग्रेट टॅलेंट हंट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण मराठवाडा साथीच्या पीसीएन न्यूजच्या चॅनल क्रमांक 651 वर करण्यात येत आहे. दररोज दुपारी 3 वाजता सुरू होणारी ही स्पर्धा सायंकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत या चॅनलवर परळीकरांना पाहण्यास मिळत आहे. गीत, संगीत, वादन, कला आणि संस्कृतीवर आधारित कलाकारांची कला पाहण्याची मेजवानी मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here