Home मराठवाडा मानूर परिसरात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे

मानूर परिसरात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे

710
0
तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याच्या सोशल मीडीयावरील व्हायरल संदेशानां अफवांचे स्वरुप देणाऱ्या वन विभागास अखेर मानुर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे अढळून आले आहेत. मानुरसह परिसरातील जाटवड, बडेवाडी, बाजगजवाडी, शेरी शिवारात बिबट्या अढळूण आल्याचे नागरीकांनी सोशल मीडीयावर संदेश व्हायर केले होते. त्यानुसार मानुर परिसरात शोध मोहिमेद्वारे परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊल खुना (ठसे) अढळून आल्याने नागरीकांना खबरदारीच्या सुचना वन वनिभागने दिल्या आहेत.

शिरुर कासार/पाथर्डी (जि. अहमदनगर) : तालुक्या नंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ घातला आहे. आष्टी तालुक्यात तीघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाची राज्यभरातील पथक तैनातीत असताना तालुक्यातील मानूर (नागनाथ) परिसरात वन विभागास बिबट्याचे ठसे अढळून आल्याने नागरीकात भीतीचे वातावणरण निर्माण झाले आहे. मानूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सोशल मीडीयावरील व्हायरल संदेशाना वन विभागाने अफवांचे स्वरूप दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ठसे अढळूण आल्याने जाटवड शिवारात वन विभागाने पिंजरा लाऊन नागरीकांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.
तालुक्यातील मानूरसह भगवानगडाच्या पायाथ्याशी पारगाव घोगस, माळेगव चकला , भारजवाडी (ता. पाथर्डी) परिसरात बिबट्याचा वावर असल्याची असल्याची कुजबुज सुरू होती. सोशल मीडीयावरही अनेकांनी बिबट्यास प्रत्यक्षदर्शी दिसून आल्याचे संदेश सोशल मीडीयाच्या व्हाट्स अप, फेसबुकवर व्हायरल केले. मात्र, अधिकृत माहिती अथवा प्रत्यक्ष खात्री अभावी वन विभागाकने त्यास अफवांचे स्वरुप देत नागरीकांनी भयभित न होता खबरदारीच्या सुचना दिल्या होत्या. पंधरवाड्यापूर्वी मानूर परिसरातील जाटवड शिवारात बिबट्या दिसून आल्याची माहिती येथील नागरीकांनी दिली. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य पती रामदास बडे यांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून शिवारात शोध मोहिम राबवली. मात्र, बिबट्याचा वावर असल्या बाबतचे ठोस पुरावे पायांचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे वन विभागाने अफवांवर विश्वास न ठेवता शेतात काम करताना खबरदारी च्या सुचना दिल्या. सोमवारी (दि.30) मानूर परिसरातील जाटवड येथे बिबट्या प्रत्यक्षदर्शी आढळून आल्याच्या माहिती नागरीकांनी दिली. त्यानुसार वन विभगाने परिसरात शोध मोहिमे अंतर्गत जाटवड शिवारात बिबट्या च्या पाउल खुना (पग मार्ग, ठसे) मिळाल्याचे जाहिरकरत जाटवड परिसरात पिंजरा लावला आहे. दरम्यान, मानुर परिसरात बिबट्याचे ठसे मिळाल्याने परिसरातील गावखेड्यांसह वाडी-वस्त्यांवरील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वावरणाऱ्या बिबट्यास पकण्यासाठी तात्काळ ठोस उपाय योजनाची मागणी करण्यात येत आहे. तालुक्यात खरिपासह रब्बी पिकांच्या मशागतींना जोमात असतानाच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सामान्य नागरीकांपासून शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.


वाघ (बिबटे) नेमके किती?
:आष्टी तालुक्यासह पाथर्डी, भगवानगड, माजलगाव, गेवराई, पाटोदा तालुक्यात सर्वत्र बिबट्याची चर्चेमुळे नेमके वाघ (बिबट्या) किती ? हा प्रश्न उद्भवत असला तरी अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच वन विभागाने सक्षम यंत्रणे मार्फत मानूर परिसरातील बिबट्यास पकडण्याची मागणी धास्तावलेल्या नागरीकातून होत आहे.

पाडळीत आढळला होता बिबट्या :
तालुक्यातील पाडडळी येथील उथळा प्रकल्याप परिसरात पंधरा वर्षापूर्वी बिबट्या अढळून आला होता. वन विभागास खात्री पटल्या नंतर पिंजरा लावून त्या बिबट्यास पकडले बिबट्यास पकडले. मात्र, त्या बिबट्याने कुठल्याही पाळीव अथव माणसावर हल्ला केला नव्हता अशी माहिती प्राणी मित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here