Home इतर गरिबांच्या मदतीसाठी चर्चेत असलेल्या या अभिनेत्या विरोधात बीएमसीची तक्रार…!

गरिबांच्या मदतीसाठी चर्चेत असलेल्या या अभिनेत्या विरोधात बीएमसीची तक्रार…!

51
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या मदतीसाठी चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात बीएमसी ने तक्रार दाखल केली आहे.यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिच्या नंतर आता अभिनेता सोनू सूद मुंबई महापालिकेच्या नजरेवर असल्याचे बोलले जात आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनू सूदने जुहूमधील मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचे बीएमसीचे म्हणणे आहे.यानुसार एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार दाखल करावी, असे बीएमसीकडून जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे.

दरम्यान,”जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती ‘सागर’ या रहिवासी इमारतीमध्ये कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय हॉटेल सुरु केले आहे.असे कळाले आहे की,सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवला असून त्यात बदल केले आहेत.बीएमसी ने (४ जाने.)जुहू पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हंटले आहे.

या प्रकरणी विचारले असता सोनू सूदने सांगितले की,इमारतमधील बदलासाठी त्याने महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे.आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरीसाठी ते थांबले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here