Home क्रीडा टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत…!

टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत…!

91
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे.यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री,अजिंक्य रहाणे,रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर,पृथ्वी शॉ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.मुंबई विमानतळावर मायदेशी परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना थेट घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.

कोरोनाच्या नियमामुळे विमानतळावर चाहत्यांना गर्दी करण्यास बंदी होती.त्यामुळे खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी अजिंक्य रहाणेच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी यावेळी विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.

दरम्यान,एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंच्या आतापर्यंत अनेकदा कोविड टेस्ट झाल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांनी ब्रेक जर्नी करतानाही संपूर्ण नियमांचे पालन केले आहे.तसेच प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here