Home क्राइम मॉडेलिंगचे अमिष दाखवून आणले वेश्या व्यवसायात…!

मॉडेलिंगचे अमिष दाखवून आणले वेश्या व्यवसायात…!

601
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडूनकास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अटक करण्यात आले आहे.१४ वर्षांच्या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप या कास्टिंग डायरेक्टरांवर करण्यात आला आहे.दरम्यान,या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचे उघड झाल्याने मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई केली आहे.याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अंधेरी पूर्वेतल्या मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये समाजसेवा शाखेने छापा टाकून ही कारवाई केली आहे.

दरम्यान,याप्रकरणी कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल, मोहम्मद शेख, विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया यांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा पथकाने अटक केली आहे.याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here