Home आरोग्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ‘पॉझिटिव्ह’…!

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ‘पॉझिटिव्ह’…!

814
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी स्वत:च सोशल मिडियातून पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे गेल्या दोन तीन दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचण्या करून घेण्याचे आवाहन खैरेंनी केले आहे.

सातत्याने लोकसंपर्कात राहाणारे चंद्रकांत खैरे यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली नाही. पण आता त्यांना लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांनी सोशल मिडियावर जी पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की ‘’माझी आज कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल’’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here