Home इतर ‘ड्रॅगन फ्रूट’ झाले ‘कमलम’…!

‘ड्रॅगन फ्रूट’ झाले ‘कमलम’…!

275
0

मराठवाडा साथी न्यूज

गांधीनगर : ‘ड्रॅगन फ्रूट’ हे फळ यापुढे आता ‘कमलम’ या नावाने ओळखले जाणार आहे.असा अजब निर्णय गुजरात या राज्याने घेतला आहे.‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.’राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूट या फळाचे नाव बदलण्याचा निर्णय़ घेतला आहे. या फळाचा बाह्य आकार हा कमळाच्या फुलाप्रमाणे आहे. त्यामुळे याचे नाव ”कमलम” असायला हवे’,असेही रुपाणी म्हणाले. यावेळी अधिक बोलत त्यांनी फळाच्या नावाचा चीनशी संदर्भ लागतो आणि आम्ही तो बदलला आहे,असे स्पष्टीकरणही त्यांनी मंगळवारी दिले.

दरम्यान,कमळाला संस्कृतमध्ये कमलम,असे म्हणतात.महत्वाचे म्हणजे गुजरातमध्ये भाजप कार्यालयाचे नावही कमलम आहे.त्यामुळे आता या नामकरणाचा नेटकऱ्यांनी भाजप सोबत संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here