Home शहरं १०० किलोमीटर आधीच तृप्ती देसाई यांना ‘अटक’…!

१०० किलोमीटर आधीच तृप्ती देसाई यांना ‘अटक’…!

474
0

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे बोर्ड लावल्यानंतर आता या बोर्डवरून वातावरण चांगलंच चिंगळल आहे. देसाई आज शिर्डीला बोर्ड हटविण्यासाठी जात असताना त्यांना अहमदनगरच्या सुपे टोलनाक्यावर अडवण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिर्डीपासून १०० किलोमीटर आधीच तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.सुपे पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलं आहे.

देसाई म्हणाल्या की,आज मानवाधिकार दिन आहे, त्या दिवशी आम्हाला अडवलं आहे. साई संस्थाननं लावलेला बोर्ड हटवण्यासाठी जात आहे. पोलिस म्हणत आहेत, चर्चा करा. मात्र संविधानाच्या अधिकाराचं हनन आहे. आमची भूमिका आहे की पोलिसांनी आमच्यासोबत यावं आणि बोर्ड हटवण्यास मदत करावी. असा निर्णय घेणाऱ्या शिर्डी संस्थानवर कारवाई करायला हवी मात्र इथं आम्हालाच अडवलं जात आहे असं त्या म्हणाल्या. काहीही केलं तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. आम्ही शांततापूर्ण वातावरणात जात आहोत. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here