Home क्राइम पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या सात जणांना अटक

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या सात जणांना अटक

278
0

छत्रपती संभाजीनगर : प्‍लॉटवरुन दोन गटात तुफान हाणामारी सुरु असतांना वाद सोडविण्‍यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केल्याने दोन कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात सातजणांना अटक करण्यात आली असून त्‍यांना १० मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एस. छल्लानी यांनी बुधवारी दिले.विनोद प्रेमचंद महतोले, संतोष माणिकचंद महतोले, धनराज प्रेमचंद महतोले, प्रविण माणिकचंद महतोले युनूस खान अहेमद खान, अफ्सर खान अहेमद खान आकाश विलास गायकवाड (रा. शिवाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात उपनिरीक्षक कौतीक गोरे यांनी फिर्याद‍ दिली. उस्‍मानपूरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. वरील आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले, त्यावेळी सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तीवाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here