Home मनोरंजन शाहरुख खान बद्दलचे राणी मुखर्जीने व्यक्त केली मनातली इच्छा

शाहरुख खान बद्दलचे राणी मुखर्जीने व्यक्त केली मनातली इच्छा

446
0

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. आशिमा छिब्बर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी राणीचे खूप कौतुक होत आहे. ‘राजा की आयेगी बारात’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राणीला शाहरुख खानसोबत ‘कुछ कुछ होता है’मधून यश मिळाले. नुकतेच राणीने शाहरुखबरोबर चित्रपट करण्यावरून मनातील सुप्त इच्छा व्यक्त केली आहे.

‘इंडिया टुडे’ने घेतलेल्या मुलाखतीत जेव्हा राणीला विचारले गेले की, ती शाहरुख खानसोबत आणखी एक चित्रपट करण्यास तयार आहे का, तेव्हा राणीने उत्तर दिले की, लेखकांनी एक अशी प्रेमकथा घेऊन यावी ज्यात माझ्याबरोबर शाहरुखही असेल. मला वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत शाहरुखबरोबर रोमान्स करायला आवडेल, असेही राणी म्हणाली.

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘चलते चलते’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पिंकविलाशी बोलताना राणीने दिलखुलास गप्पा मारल्या. दोन चित्रपटांमध्ये एवढा वेळ का घेतेस, या प्रश्नावर राणी म्हणाली, ‘मी एवढा वेळ घेते, कारण प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबाबात मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहते. खरे तर मी घरातच असते. मी जगभरातील सिनेमा पाहते. काय येत आहे आणि जगभरातील लोक काय कामे करत आहेत हे मी बघत असते,’ असे राणी म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here