Home दिल्ली गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या

गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या

234
0

जर तुम्ही LPG गॅस सिलिंडरचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून LPG गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मात्र यावर मोठे अपडेट आलेले आहे.

आज होळी हा सण आहे. अशा वेळी गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण तुम्हाला स्वस्त गॅस सिलिंडर खरेदी करण्याची संधी आहे. देशाच्या राजधानीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तात गॅस सिलिंडर कसा बुक करू शकता.

तुम्ही अॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला त्यात कॅशबॅकचा पर्याय मिळेल. पेटीएमसह अनेक अॅप्सद्वारे तुम्हाला गॅस सिलिंडर बुकिंगवर कॅशबॅकची सुविधा मिळत आहे, परंतु आता तुम्हाला बजाज फायनान्स अॅपद्वारेही गॅस बुकिंगवर सूट मिळत आहे.

डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या बजाज फिनसर्व्ह अॅपद्वारे ग्राहकांना गॅस बुकिंगवर 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरसाठी तुम्हाला कोणताही प्रोमो कोड वापरण्याची गरज नाही, परंतु तुम्ही बजाज पे UPI द्वारे पेमेंट करून सूट मिळवू शकता.

दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे, तर मुंबईत गॅस सिलेंडर 1102.50 रुपयांना उपलब्ध आहे. मार्चपूर्वी कोलकात्यात सिलिंडरची किंमत 1079 रुपये होती, ती वाढून 1129 रुपये झाली आहे.

चेन्नईतही 1 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडर महागले आहेत. या शहरात पहिल्या सिलेंडरची किंमत 1068.50 रुपये होती, मात्र आता त्याची किंमत 1118.50 रुपये झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here