Home महाराष्ट्र ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय उपयोग?त्यांना शरद पवारच आवडतात : चंद्रकांत पाटील

‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय उपयोग?त्यांना शरद पवारच आवडतात : चंद्रकांत पाटील

104
0

मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. त्यामुळं त्यांनाच भेटलं पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात,’ अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.
ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळं एखाद्या प्रश्नासाठी पवारांनाच भेटलं पाहिजे,’ असं पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here