Home बीड बिबट्याच्या हल्ल्यात पंचायतसमिती सदस्य पती ठार

बिबट्याच्या हल्ल्यात पंचायतसमिती सदस्य पती ठार

नरभक्षक बिबट्याने नागनाथ गर्जे यांचा चेहरा आणि मानेवर मोठा चावा घेतल्याने त्यांचा चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता. घटनेची माहिती कळताच धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वायभासे यांनी घटनास्थळी भेट देऊन गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टीच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.

660
0

मराठवाडा साथी न्यूज

 आष्टी: तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी (दि.24) सुरडी (ता.आष्टी) येथील पंचायत समिती सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर सायंकळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते जागीच ठार झाले.

मोराळा (ता.आष्टी) पंचायत समिती गणाच्या पचायत समिती सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे हे सुरुडी येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि.24) दुपारच्या दरम्यान नागनाथ गर्जे घरून वाघदरा या आपल्या शेताकडे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाच दरम्यान गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर ते ओरडले होते. मात्र मदत न मिळाल्याने बिबट्याने त्यांचा जीव घेतला. त्यानंतर मात्र सायंकाळ पर्यंत ते न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला.
नरभक्षक बिबट्याने नागनाथ गर्जे यांचा चेहरा आणि मानेवर मोठा चावा घेतल्याने त्यांचा चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता. घटनेची माहिती कळताच धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वायभासे यांनी घटनास्थळी भेट देऊन गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टीच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी समाजसेवक विजय गोल्हार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here