Home अहमदनगर शिर्डी व कोपरगाव च्या नवीन इमारतीत पोलीसांचे कामकाज सुरू करावे : संजय...

शिर्डी व कोपरगाव च्या नवीन इमारतीत पोलीसांचे कामकाज सुरू करावे : संजय काळे

15363
0

कोपरगाव (किसन पवार) :
कोपरगाव व शिर्डी येथे अद्यावत पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण होऊन जवळ जवळ सहा महीने पुर्ण झाले तसेच शिर्डी मध्ये पोलीसांसाठी घरांचे देखील बांधकाम पुर्ण झालेत. शासनाने कोट्यावधी रूपयांचा खर्च केलेला आहे पण ह्या वास्तू अजून वापरात नाही, तात्पूर्त्या केलेल्या सोईसाठी शासन भाडे मोजत आहे, जर नव्या जागेत पोलीस कार्यालये चालू झालेत तर शासनाचा खर्च वाचेल तसेच पोलीस कर्मचारी नवीन जागेत नवीन उत्साहात काम करतील. तरी सदरच्या वास्तूचे आपण आठ दिवसात लोकार्पण करावे अशी मागणी ई-मेल द्वारे राज्याचे मुख्य सचिव यांना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.
ई-मेल मध्ये काळे पुढे म्हणाले की आठ दिवसांत लोकार्पण झाले नाही तर व्यवस्थापनाचे विरूद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.तसेच २६ जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिनाचे दिवशी लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल. २७ जानेवरी २०२२ रोजी सकाळी १० वाजता विना घेऊन संजय काळे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक यांना नवीन पोलीस स्टेशन इमारती मध्ये शासकीय कामकाज चालू करण्यासाठी निमंत्रीत करणार आहेत आणि २७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजता कोपरगाव ग्रामीण चे पोलीस निरीक्षक यांना नवीन जागेत शासकीय कामकाज चालू करण्यासाठी निमंत्रीत करणार आहेत. त्याचप्रमाणे दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वीना वाजवत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक व पोलीस निरिक्षक यांना नवीन जागेत शासकीय कामकाज चालू करण्यासाठी निमंत्रीत करणार आहे. करदात्या जनतेने पोलीसांसाठी इमारती उभ्या केल्या आहेत. केवळ उदघाटनाच्या प्रतिेक्षेत नव्या इमारती धूळ खात पडून असल्यामुळे व शासनाच्या उदासीनते मुळे हा निर्णय घेत असल्याचे काळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here