Home मनोरंजन “नटखट” चित्रपट ऑस्करवारीत

“नटखट” चित्रपट ऑस्करवारीत

423
0

विद्या बालनचा “नटखट ” चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहचला

मुंबई :सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणारा असा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आता अभिनेत्री विद्या बाळांचा ” नटखट ” हा चित्रपट शर्यतीत उतरला आहे. RSVP ने त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘नटखट’ या लघुपटाला ऑस्कर २०२१ मध्ये शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असा ” नटखट ” हा लघुपट आहे. समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा लघुपट प्रकाश टाकतो.

याबाबत विद्या बालनने प्रतिक्रिया दिली आहे. “मागील एका वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या. मात्र, या काळात आमच्या शॉर्ट फिल्मची ऑस्करसाठी निवड करण्यात आली ही खरंच फार छान गोष्ट घडली. ही लघुकथा मला अत्यंत जवळची आहे. लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाली”, असे विद्या म्हटली आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्क्रिनिंग :

वी आर वन: अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (२ जून २०२०) मध्ये या नटखटचे वर्ल्ड प्रिमिअर करण्यात आले होते. . तसेच इंडियन फिल्म फेस्टिव्हल स्टटगार्ट ( १५ ते २० जुलै) या काळात स्क्रीनिंग करण्यात आले होते. . याप्रमाणेच जर्मन स्टार ऑफ इंडियाअवॊर्ड देखील मिळाला आहे.त्यासोबतच मेलबर्नमध्ये इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा लघुपट दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे फिल्म बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे विजेतेपददेखील नटखटने पटकावले आहे. त्यामुळे आता ऑस्करसाठी याची निवड होणे ही मोठी बाब मानली जात आहे. याबाबत विद्याने आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here