Home क्राइम खून करुन फ्लॅटच्या भिंतीत लपवला प्रेयसीचा मृतदेह…!

खून करुन फ्लॅटच्या भिंतीत लपवला प्रेयसीचा मृतदेह…!

475
0

मराठवाडा साथी न्यूज

पालघर : प्रेमावरून विश्वास उठेल अशी अत्यंत धक्कादायक घटना पालघरमध्ये उघड झाली आहे.चक्क तरुणाने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत ३ महिने लपवून ठेवला.प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे. वाणगावमधील वृंदावन येथील एका फ्लॅटच्या भिंतीत तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नजीकच्या परिसरात खळबळकजनक वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ महिन्यांअगोदर उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी आपल्या प्रियकराबरोबर प्रेमविवाह करण्यास घरातून निघून गेली,मात्र ती परत न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरु केला.मात्र,याकाळात तरुणीचा प्रियकर तिचे सोशल मीडिया वापरत होता.फक्त एव्हढेच नाही तर व्हॉट्सअॅपद्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच असल्याचे भासवून संपर्कात होता.पण काही दिवसांनी अमिताच्या घरच्यांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान,तपास सुरु असतांना तरुणीच्या प्रियकराने त्याचा गुन्हा कबुल करत धक्कादायक माहिती दिली.त्याने पोलिसांना सांगितले की,तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केली.त्यानंतर फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन स्वतः भिंतीवर बांधकाम केले.फक्त एव्हढेच नाही तर चार महिन्यांपासून तो याच फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होता.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here