Home क्राइम पतीच्या व्यसनामुळे तिने संपवले ‘कुटुंब’…!

पतीच्या व्यसनामुळे तिने संपवले ‘कुटुंब’…!

373
0

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : नागपूरसह सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या राणे कुटुंबियांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.पतीला असलेले व्यसन,वाईट सवयी त्यामुळे होण्याऱ्या कौटुंबिक कलहामुळे डॉ सुषमा राणे यांनी आपले पती प्राध्यापक धीरज राणे यांसह दोन्ही मुलांना अगोदर विषाचे इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

काय आहे प्रकरण

महिन्यांअगोदर (१८ ऑगस्ट)दुपारी कोराडी परिसरातील जगनाडे लेआऊटमधील राहत्या घरी राणे कुटुंब मृतावस्थेत आढळले होते. एका महाविद्यालयात विभाग प्रमुख असलेले धीरज राणे,डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नी सुषमा राणे यांनी मुलगा ध्रुव(वय ११)आणि मुलगी वण्या(वय )यांचे मृतदेह त्यांच्या घरात वाढ़ळुन आले.घटनेच्या वेळी प्रा.धीरज राणे आणि दोन्ही मुले बेडरूम मध्ये मृतावस्थेत आढळले होते तर डॉ.सुषमा राणे शेजारच्या खोलीत गळफास लावून होत्या. त्यामुळे चार जणांचा मृत्यू कसा आणि का झाला असा प्रश्न पोलिसांसमोर होता.फॉरेन्सिक पुरावे, घटनेच्या आधीच्या काही काळातील घटनाक्रम तसेच प्रा. धीरज आणि डॉ सुषमा यांच्या मोबाईल फोन्सचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी डॉ.सुषमा यांनी पती आणि दोन्ही मुलांची आधी विषाचे इंजेक्शन देऊन हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

राणे घ्यायचे पत्नीवर संशय

प्रा.धीरज पत्नीवर संशयच घ्यायचे. त्यांची स्वतःची वर्तवणूक चांगली नव्हती,त्यांनादारूचे अति व्यसन होते त्यामुळे कुटुंबात वाढवण्याचे ते प्रमुख कारण बनले होते.व्यसनामुळे धीरज हे महाविद्यालयातही नियमितपणे जात नव्हते. त्यामुळे सुषमा यांनी स्वतः आत्महत्या करून कुटुंब संपविण्याचा बनिर्णय घेतला.

कुत्र्याला मारण्यासाठीच्या इंजेकशनने;संपविले स्वतःचे कुटुंब

१७ ऑगस्ट रोजी डॉ.सुषमा यांनी स्वतः नोकरी करत असलेल्या रुग्णालयातून कुत्र्याला मारण्यासाठीचे इंजेक्शन आणले आणि त्या इंजेक्शनचा वापर त्यांनी स्वतःचे कुटुंब संपविण्यासाठी केला.पती सह दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी शेजारील खोलीत जाऊन स्वतः गळफास घेऊन आपलाही जीव घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here