Home औरंगाबाद नदी प्रदूषणात देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर:मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक तर बिहार तिसऱ्या...

नदी प्रदूषणात देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर:मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक तर बिहार तिसऱ्या स्थानी

889
0

औरंगाबाद:नद्यांच्या प्रदूषण पाहणी अहवालातून उघड,झाले आहे की ,नदी प्रदूषणाच्या पाहणीत मध्यप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात १९ पट्टे आढळले आहेत. बिहार १८ पट्ट्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. केरळमध्ये १८, कर्नाटकात १७, उत्तरप्रदेशात १७, राजस्थानात १४ तर गुजरामध्ये १३ दुषीत पट्टे आढळले आहेत. महाराष्ट्रातील नद्यांच्या अहवालात अतिप्रदुषित गटात चार पट्टे आढळून आले. त्यात कृष्णा नदीचाही समावेश आहे. भीमा, गिरणा, गोदावरी, गोमती, हिरवा, इंद्रायणी, काळू, कोयना या नद्याही अनेक पट्ट्यात प्रदुषित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.सांगली देशभरातील ६०३ नद्यांच्या प्रदुषणाचा पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५५ पट्टे महाराष्ट्रातील आहेत. या अहवालानुसार, देशातील नदी प्रदूषणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याने राज्यातील प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे झाले आहे .तसेच कृष्णा नदी उगमानंतर काही किमी अंतरातच मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचेही यातून समोर आले आहे. देशातील मोठ्या नद्यांच्या यादीत कृष्णेचे नाव अग्रभागी आहे. नदीच्या उगमानंतर अवघ्या काही किमीमध्ये सातारा जिल्ह्यातच नदीचे पाणी दूषित होत असल्याचे आढळून आले. पुढे कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. त्यानंतर सुमारे १० ते १२ सहकारी साखर कारखाने नदीच्या काठावर असल्याने या नदीच्या प्रदुषणात वाढ होते. कृष्णेचे पाणी पिणाऱ्यांना ‘लिव्हर सिरॉसिस’ हा आजार असल्याचे दिसून येते. तसेच कृष्णेच्या पाण्यात कॉस्टिक सोडा, स्पेंट वॉश व मळीचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here