Home आरोग्य जेवताना पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत

जेवताना पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत

248
0

आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो की, जेवताना कधीही पाणी पिऊ नये कारण त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटाचे विकार होऊ शकतात. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, काही लोक जेवताना पाणी पिऊ शकतात आणि आजारांपासून दूर राहू शकतात. न्यूट्रिशनिस्टच्या मते सांगतात की जेवताना पाणी पिऊ शकता पण त्याचे एक योग्य पद्धत आहे. पाणी पिण्याच्या या आयुर्वेदिक पध्दतीमुळे तुम्ही बद्धकोष्टता, अपचन, गॅस, मुळव्याध अशा आजारांपासून सुटका मिळवू शकता.जर तुम्हाला पचनक्रियेसंबधीत अनेक समस्या असल्यास जेवताना थोडे पाणी पिणे योग्य आहे. पण लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका. एक घोट पाणी प्या. जेवताना जर पाणी प्यायचे असेल तर योग्य पद्धत जाणून घ्या. जेवताना पाणी पित असल्यास एका वेळी एक घोट पाणी प्यावे. संपूर्ण जेवणादरम्यान एक -एक घोट प्यायल्याने त्याचे विभाजन लहान भागात होते ज्यामुळे अन्न पचण्यास फायदा होतो.
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की जेवताना पाणी पिऊ शकता पण त्याचे एक योग्य पद्धत आहे. पाणी पिण्याच्या या आयुर्वेदिक पध्दतीमुळे तुम्ही बद्धकोष्टता, अपचन, गॅस, मुळव्याध अशा आजारांपासून सुटका मिळवू शकता.अन्न पचण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक विषारी पदार्थ निर्माण होतात. हे विषारी पदार्थ शरीरास हानी पोहचवू शकतात.
पाणी पिताना या गोष्टी ठेवा लक्षात
१. पाणी पिताना नेहमी बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिऊ नये.
२. एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा.
३. साधारण किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, गार पाणी प्यायचे असेल तर माठातील पाणी प्यावे.
४. सकाळी उठल्यानंतर सर्व प्रथम पाणी प्यावे.
५. तुम्ही जेवणाअगोदर १ तास आधी पाणी पिऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here