Home मनोरंजन जीव माझा गुंतला’ फेम मल्हारच्या हातावर खास टॅटू अर्थाचा उलगडा ,या खास...

जीव माझा गुंतला’ फेम मल्हारच्या हातावर खास टॅटू अर्थाचा उलगडा ,या खास व्यक्ती साठीचा हा टॅटू

236
0

मुंबई,: ‘जीव माझा गुंतला’या मालिकेतून मल्हारच्या रुपात अभिनेता सौरभ चौगुले सर्वांची मनं जिंकत आहे. मालिकेतील अंतरा-मल्हारची आंबट-गोड केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. अंतरा आणि मल्हारचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मल्हार अर्थातच सौरभ चौगुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सौरभ सतत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. चाहतेही अभिनेत्याबद्दल लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच सौरभच्या हातावर असलेल्या टॅटूचं नेहमीच चाहत्यांमध्ये कुतूहल आहे. आज आपण या टॅटूमागची खरी गोष्ट जाणून घेणार आहोत.
सेलिब्रेटी म्हटलं की त्यांच्या अभिनयापासून ते खाजगी आयुष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचं बारकाईने लक्ष असतं. अभिनेत्याच्या हेअरस्टाईलपासून ते कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टीबाबत जाणून घेण्यासाठी चाहते अतिशय उत्सुक असतात. असंच काहीसं अभिनेता सौरभ चौगुलेसोबत झालं आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या माध्यमातून सौरभ घराघरात पोहोचला आहे. सौरभच्या चाहत्यांना त्याच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सौरभच्या अहातावर एक खास टॅटू आहे. त्याचे चाहते नेहमीच या टॅटूबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.दरम्यान आता सौरभने स्वतः आपल्या चाहत्यांना या टॅटू मागचा अर्थ आणि खरं कारण सांगितलं आहे. सौरभ चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो आणि रिल्स शेअर करत असतो. चाहतेही त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात.सौरभने नुकतंच इन्स्टा पोस्ट करत आपल्या हातावरील टॅटूची माहिती दिली आहे. पोस्ट लिहत अभिनेत्याने म्हटलंय, ”लोक नेहमी मला या टॅटूमागचे कारण विचारतात, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे!…. आजोबा !”
माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक! तुम्ही आमच्या सोबत नसला तरी तुमच्या शिकवणीने मला नेहमीच आधार दिला आहे. मला तुमची खरोखर आठवण येत नाही कारण, तुम्ही मला वाटलेले जीवनाचे धडे कायम माझ्यासोबत आहेत.जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणत्याही परिस्थितीची उत्तर नसतात तेव्हा मी माझ्या हातावरची तुमची स्वाक्षरी (टॅटू) पाहतो आणि मला जाणवते की तुम्ही माझा हात धरला आहे. त्याद्वारे मला मार्गदर्शन करत आहात’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here